प्रा. जोगेंद्र कवाडे
प्रा. जोगेंद्र कवाडे 
मुख्य बातम्या

अकरा जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढू : जोगेंद्र कवाडे

टीम अॅग्रोवन

नाशिक : धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी येत्या निवडणुकीत ११ जागा मिळाव्यात असा प्रस्ताव रिपब्लिकन आघाडीने  काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला आहे. त्याबाबत ऑगस्टअखेरपर्यंत आम्हाला शब्द हवा आहे. जागा न मिळाल्यास स्वबळावर लढणार असल्याचे रिपब्लिकन जनशक्ती आघाडीचे निमंत्रक प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. 

रिपब्लिकन आघाडीचे निमंत्रक प्रा. कवाडे शुक्रवारी (ता. ९) नाशिक येथे आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे गणेश उन्हवणे, सुनील निकाळजे, शशिकांत उन्हवणे आदी उपस्थित होते.  

प्रा. कवाडे म्हणाले, की रिपब्लिकन हा फक्त पक्ष नसून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. हा विचार टिकविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन जनशक्ती आघाडीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातील विविध गटांचे नेते एकत्र आले आहेत. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेली महाआघाडी रिपब्लिकन विचार मजबुतीने उभा राहावा, यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढेल. रिपब्लिकन आघाडीने काँग्रेस पक्षाकडे ३३ जागांची मागणी केली आहे. मात्र, त्यांपैकी ११ जागा आघाडीला हव्याच आहेत. 

काँग्रेस व मित्रपक्षांसोबत निवडणुका लढताना जागांची मागणी करतो. मात्र काँग्रेसकडून जाणीवपूर्वक जागावाटपाचा घोळ अखेरपर्यंत घातला जातो. अखेरच्या क्षणी जागा कमी केल्या जातात. काँग्रेसने ऑगस्टअखेर जागांबाबत न कळविल्यास रिपब्लिकन जनशक्ती आघाडी सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. त्यात नाशिकमधील देवळाली, निफाड आणि नाशिक पूर्व हे मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे मागितले आहेत, असे प्रा. कवाडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT