जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगित
जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगित 
मुख्य बातम्या

जेईई, नीट परीक्षा सप्टेंबरपर्यंत स्थगित

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे ‘जेईई मेन २०२०’ तसेच ‘जेईई ॲडव्हान्स २०२०’ आणि वैद्यकीय प्रवेशांसाठीची राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट२०२०’ कोरोनाच्या संसर्गामुळे आता सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याआधी २६ जुलै रोजी होणारी ‘नीट’ परीक्षा आता १३ सप्टेंबरला होईल. १८ ते २३ जुलै दरम्यान होणारी ‘जेईई मेन’ आता १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होईल. ‘जेईई ॲडव्हान्स’ २७ सप्टेंबरला होईल. कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षा आधी जुलैमध्ये आणि आता सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. यावर्षी नीट परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तर जेईई मेनसाठी सुमारे ९ लाख आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी जवळपास तेवढ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT