Jalna, Nanded, Parbhani On the rain radar
Jalna, Nanded, Parbhani On the rain radar 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने दमदार हजेरी लावली. जालना, परभणी, नांदेड हे जिल्हे अक्षरश: पावसाच्या रडारवर होते. या तीन जिल्ह्यांसह लातूर, बीड, हिंगोली मिळून सहा जिल्ह्यातील तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. गुरुवारीही मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस कायम राहिला. 

सुरवात अडखळत करणारा पाऊस गत काही दिवसापासून मराठवाड्यात जोर धरण्याचा प्रयत्न करतो आहे. गुरुवारी सकाळपर्यतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सर्वदूर पावसाने तुरळक, हलकी, मध्यम, दमदार, जोरदार ते अतिजोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील २ मंडलांत तर अनुक्रमे १७४ व २०७ मि.मी.पर्यंत पाऊस झाला. परभणी, नांदेड, जालना जिल्हे खासकरून पावसाच्या रडारवर असल्याचे दिसले. जालना जिल्ह्यातील १५ मंडलात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील २४ मंडलांत, तर परभणी जिल्ह्यातील ३२ मंडलांत पावसाने कहर केला. हिंगोली, लातूर, बीड या तीनही जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन मंडलात अतिवृष्टी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडलांपैकी १३ मंडलांत २० ते ४३ मि.मी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ मंडलांपैकी अतिवृष्टीची दोन मंडले वगळता ३० मंडलांत २० ते ५० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील माजलगाव, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी तालुक्‍यात दमदार ते जोरदार पावसाची हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील ६० मंडलांपैकी २ अतिवृष्टीची मंडले वगळता इतर सर्वच मंडलात जोरदार पाऊस झाला. जवळपास २० ते ५६ मि.मी पाऊस झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२ मंडलात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यात सरासरी ५०.९ मि.मी पाऊस नोंदला गेला. जिल्ह्यातील घनसावंगी, मंठा तालुक्‍याला पावसाने अक्षरश: झोडपले. घनसावंगी तालुक्‍यात सरासरी ८२ मि.मी, तर मंठा तालुक्‍यात सरासरी ७५.५ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात सरासरी ७६.६ मिलिमीटर, गंगाखेड ५१.७, पाथरी ७५, जिंतूर ७१.४, पूर्णा ७०.९, पालम ६४.६, सेलू ८३.२, सोनपेठ ४३.८, तर मानवत तालुक्यात सरासरी ७९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२७ मि.मी पाऊस झाला. त्यापाठोपाठ किनवट तालुक्यात सरासरी १४१.९ मि.मी पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT