जळगाव निवडणूक निकाल
जळगाव निवडणूक निकाल 
मुख्य बातम्या

जळगाव महापालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ प्रभागांमधील ७५ जागांपैकी ५७ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेला फक्त १४ जागा जिंकून समाधान मानावे लागले आहे. दोन्ही काॅँग्रेसला खातेही उघडता आले नाही. भाजपने प्रथमच पालिकेत सत्ता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  

भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली. शिवसेनेचे नेतृत्व माजी मंत्री सुरेश जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शुक्रवारी (ता. ३) शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील सेक्‍टर आठमध्ये सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. 

मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेना नेते सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खानदेश विकास आघाडीची मनसेच्या पाठबळाने सत्ता स्थापन झाली होती. खानदेश विकास आघाडीचे ३२ नगरसेवक होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर जैन गटाने निवडणूक लढली. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काॅँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले होते. आता राष्ट्रवादी काॅँग्रेसने सर्व आठ जागा गमावल्या आहेत. काँग्रेस या वेळेसही खाते उघडू शकली नाही. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने प्रथमच तीन जागा पालिकेत जिंकल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT