Jalgaon district has a loan of Rs. 435 crore under 'mudra'
Jalgaon district has a loan of Rs. 435 crore under 'mudra' 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘मुद्रा’अंतर्गत ४३५ कोटींचे कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

जळगाव : ‘मुद्रा’ कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यात या वर्षी १ लाखावर खातेदारांना ४३५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तर सन २०१९-२०च्या पत आराखड्यात अकृषक, पीककर्ज, कृषी कर्ज आदी विविध घटकांतील अडीच लाखांवर खातेदारांना साडेतीन हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत देण्यात आली. 

गटशेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून बॅंकांनी कर्जवितरण करताना शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीस रिझर्व्ह बॅंकेचे सहायक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. ईखारे, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक पी. पी. शिरसाठ यांचेसह विविध बॅंका व महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुद्रा कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यात यावर्षी शिशू गटातील १ लाख ६ हजार ७८५ खातेदारांना २९९.६८ कोटी, किशोर गटातील ७ हजार ४६४ खातेदारांना ७७.२७ कोटी रुपये, तर तरुण गटातील ३ हजार ३८८ खातेदारांना ५८.६६ कोटी असे एकूण १ लाख १७ हजार ६३७ खातेदारांना ४३५.६२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. 

जिल्ह्याचा सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा हा ६ हजार ४५५ कोटी रुपयांचा असून ३० सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज, कृषी कर्ज, अकृषक क्षेत्र, प्राधान्य क्षेत्र, व अप्राधान्य क्षेत्रातील २ लाख ६३ हजार ५९३ खातेदारांना ३ हजार ४१७.१५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अरुण प्रकाश यांनी बैठकीत दिली.

या दिल्या सूचना      बॅंकांनी प्राप्त झालेल्या पात्र अर्जांवर त्वरित कर्ज मंजूर करावे.     काही अडचण असल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत लेखी उत्तर द्यावे.     प्रलंबित अर्जावर येत्या ३१ डिसेंबरपूर्वी कार्यवाही करावी.     मुद्रा अंतर्गत पात्र अर्जदारांचे कर्ज तातडीने मंजूर करावे.    त्यासंबंधी माहितीसाठी प्रत्येक शाखेत अधिकारी नेमावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT