बाजार समितीचे नवे संकुल असणार चार इमारतींमध्ये
बाजार समितीचे नवे संकुल असणार चार इमारतींमध्ये 
मुख्य बातम्या

जळगाव बाजार समितीचे नवे संकुल असणार चार इमारतींमध्ये

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन संकुल बांधण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. न्यायालयाचे आदेश हाती येताच लागलीच पुढील महिन्यात हे संकुल उभारण्यास सुरवात होईल. नवीन संकुलात मागील नियोजन किंवा आराखड्याच्या तुलनेत आठ गाळे कमी असणार आहेत, तसेच धान्य मार्केट यार्डात जाण्यासाठी नवे चार रस्ते असतील. धान्य मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारानजीक नियोजित नवीन संकुलास पुणे येथील शासनाचे रचनाकार, जळगाव पालिका यांनी परवानगी दिली आहे. परंतु, परवानगी देताना संकुल बांधण्यासंबंधी विकसकाला काही बदल करावे लागणार आहेत. त्यानुसार संकुल चार इमारतींमध्ये असेल. १८० गाळे (दुमजली इमारत) असतील. बाजार समितीत जाण्यासाठी या संकुलांच्या इमारतींनजीक सुमारे १० फुटांचे चार रस्ते असतील, तसेच मुख्य प्रवेशद्वार धरून पाच मार्ग असतील. या संकुलाला परवानगी मिळू नये, यासंबंधी जळगाव बाजार समितीमधील अडत असोसिएशनने न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील शुक्रवारी (ता. २६) यासंदर्भात निकाल दिला असून, त्यात या संकुल उभारणीसंबंधी ग्रीन सिग्नल मिळाल्याचा दावा सभापती कैलास चौधरी यांनी केला. न्यायालयाचा निकाल हाती येताच संकुल उभारण्याचे काम विकसक हाती घेईल. विकसकाला बाजार समितीला विनापरतावा अटीसंबंधी सहा कोटी रुपये द्यायचे आहेत. गाळ्यांचे बांधकाम विकसक करील. संकुलातील गाळ्यांच्या विक्रीपोटी जो निधी येईल; त्यावर विकसकाचा हक्क असेल. गाळ्याची किंमत ठरविण्याचे अधिकारही विकसकाला असणार आहेत. या गाळ्यांच्या माध्यमातून बाजार समितीला दर महिन्याला दोन लाख रुपये भाडे मिळणार आहे. तसेच, जो सहा कोटी रुपये निधी विनापरतावा तत्त्वावर मिळेल, त्यातून बाजार समितीमध्ये विकासकामे व इतर कामे घेण्याचे अधिकार बाजार समितीला असतील, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT