सोलापूर ः जकराया शुगरकडून शेतकऱ्याला अदा झालेले बिल.
सोलापूर ः जकराया शुगरकडून शेतकऱ्याला अदा झालेले बिल.  
मुख्य बातम्या

जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर जिल्ह्यात रान उठले अाहे. २७०० रुपयांची मागणी असताना शेतकरी संघटनांनी एक पाऊल मागे घेत एफआरपी अधिक ४०० रुपयांचा तोडगा मान्य करून माघार घेतली, पण कारखानदार अजूनही एकमेकांची वाट बघत बसले आहेत.
 
सोलापूर जिल्ह्यातीलच वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगरने सर्वात अगोदर जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या हंगामाचा २५०० रुपयांचा दर बोलल्याप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अन्य कारखाने आता तरी बधतील का, हा प्रश्‍न आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसदराचा हा विषय जिल्ह्यात चांगलाच धुमसत आहे.
 
स्वाभिमानी, रयत, मनसे, जनहित या शेतकरी संघटनांनी आंदोलन आक्रमक पद्धतीने करून ते वाढवले होते, पण चर्चेच्या फेऱ्यानंतर एफआरपी अधिक ४०० रुपयांवर तोडगा निघाला. हा सगळा गोंधळ जिल्ह्यात सुरू असताना, त्या आधीच जकराया शुगरचे चेअरमन बी. डी. जाधव यांनी त्यांच्या कारखान्याच्या वतीने २५०० रुपये पहिला हप्ता देणार असल्याचे जाहीर करून, सगळ्यांनाच धक्का दिला. 
 

 भाजपसह अन्य संघटनांचा रास्ता रोको ऊसदराच्या प्रश्‍नावर सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीत शुक्रवारी (ता.२४) सकाळी दहाच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेसह इतर संघटनांनी रास्ता-रोको आंदोलन केले. इतके दिवस शेतकरी संघटनाच या प्रश्‍नात आक्रमक झाल्या होत्या, पण आता भाजपही या आंदोलनात उतरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे संजय कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे आदींनी याचे नेतृत्व केले.

आमची कोणाशीही स्पर्धा नाही. आम्ही बोलल्याप्रमाणे दर जाहीर केला आणि पहिला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. भविष्यात सगळ्यांबरोबर जो अंतिम दर राहिल, त्याप्रमाणे आम्ही तो देऊ. 
- सचिन जाधव, सरव्यवस्थापक, जकराया शुगर, वटवटे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT