jagry
jagry 
मुख्य बातम्या

कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत या सप्ताहात सुमारे चार लाख गूळ रव्यांची घट झाली आहे. गुळाच्या आवकेत घट झाली असली तरी दरात मात्र विशेष वाढ झाली नसल्याचे चित्र बाजार समितीत आहे. सध्या गुळाला क्विंटलला ३५०० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. येत्या पंधरा दिवसात गुळाचा हंगाम आटपण्याची शक्‍यता आहे. यंदा अंदाजापेक्षा एक महिना उशिरा गुळाचा हंगाम सुरू झाला. महापुरात अनेक प्लॉट पाण्याखाली गेल्याने याचा परिणाम गुळाच्या दर्जावरही झाला. पावसाचा जोर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कायम राहिल्याने यंदा गूळ हंगाम लांबला आहे. गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान पुराच्या पाण्यामुळे झाले. परिणामी ज्या गुऱ्हाळमालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनी यंदा गुऱ्हाळे बंद ठेवणेच पसंत केले. यामुळे जिल्ह्यात यंदा कशीतरी दीडशे ते दोनशे गुऱ्हाळघरे सुरू आहेत. सध्या गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज दहा ते पंधरा हजार गूळ रवे बाजार समितीत येत आहेत. आणखीन पंधरा दिवस तरी सध्या होणारी गुळाची आवक कायम राहील. यांनतर आवक घटून मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक अत्यल्प राहण्याची शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली. सध्या मिळेल तेथून ऊस आणून गूळ तयार करण्यासाठी गुऱ्हाळ मालक धडपडत आहेत. दरात विशेष वाढ नाही सध्या गुळाचे दर ३५०० ते ४२०० रुपये इतके स्थिर आहेत. गुजरातच्या बाजारपेठेत सांगली, कर्नाटकमधूनही गुळाची आवक होत आहे. यामुळे कोल्हापूरच्या गुळाच्या मागणीत काहीशी घट झाली असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील गूळ उत्पादकांनी दर्जेदार गूळ तयार करण्यासाठी विशेष काळजी घेतली तरच हंगामाच्या अंतिम टप्प्यात गुळाचा दर्जा बघून दर वाढू शकतील, असा अंदाज व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT