खानदेशात पाऊस ओसरला
खानदेशात पाऊस ओसरला 
मुख्य बातम्या

खानदेशात पाऊस ओसरला

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात शुक्रवारी (ता. २७) अनेक भागांत तुरळक व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाचा जोर फारसा नव्हता. पाऊस ओसरल्याची स्थिती असून, वातावरणातील गारवा व धुके वाढत असल्याची स्थिती आहे.  या आठवड्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. सातपुडा पर्वताच्या भागात पावसाने धुमाकूळ घातला असून, या भागातील नद्यांना पूरस्थिती कायम आहे. परंतु, इतर भागांतील पाऊसमान गेल्या २४ तासांत कमी राहिले. यामुळे जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, बोरी, बहुळा, मोर या प्रकल्पांमधील आवकही कमी झाली आहे. गिरणा प्रकल्पातील विसर्ग घटविला आहे. शुक्रवारी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील एरंडोल, धरणगाव, यावल, भुसावळ, जळगाव, चोपडा, बोदवड, जामनेर तर नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा या भागांतही पाऊस झाला. कुठेही अतिवृष्टी झाली नाही. काही भागांत १० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. शुक्रवारी अनेक भागांत दिवसभर कोरडे वातावरण होते. परंतु, रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. परंतु, पाऊस कमी राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पाऊस ओसरण्याचे संकेत मिळत आहे. सध्या पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान होत आहे. तर पुढे सोयाबीन मळणीवर आला आहे. ही दोन्ही प्रमुख पिके असल्याने पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.  मागील तीन-चार दिवसांतील पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मन्याड व भोकरबारी या कोरड्या असलेल्या प्रकल्पांचा साठा २० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. धुळ्यातील कनोलीचा साठा ८० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. तर सोनवद प्रकल्पाचा साठाही वाढला आहे. 

गेल्या २४ तासातील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः पाचोरा ११, जळगाव नऊ, धरणगाव १६, एरंडोल ११. धुळे ः शिरपूर ११, शिंदखेडा ६. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT