वरखेड, साखरा येथे आंतरराष्ट्रीय शाळेचा प्रारंभ
वरखेड, साखरा येथे आंतरराष्ट्रीय शाळेचा प्रारंभ 
मुख्य बातम्या

वरखेड, साखरा येथे आंतरराष्ट्रीय शाळेचा प्रारंभ

टीम अॅग्रोवन

अकोला : वऱ्हाडातील वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत शासनातर्फे अभिनव अशी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा उभारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथून आॅनलाइन पद्धतीने त्याचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर या दोन्ही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

वरखेड शाळेत अनावरण  बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील वरखेड येथे जिल्हा परिषदेतील ही शाळा सुरू झाली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शाळेत एलईडी स्क्रीनद्वारे करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन परिपाठ सादर केला. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, आजचा सुविचार, महत्त्वाची बातमी, बोथकथा इंग्रजी भाषेतून सादर केले. 

दरम्यान, या वेळी विद्यार्थ्यांची शिस्त, त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिध्द केले. आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच सर्वांची शाबासकी मिळवली. या वेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहुल बोंद्रे, प्रभारी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे आदी उपस्थित होते.

साखरा येथेही सुरवात  वाशीम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सरपंच चंद्रकलाबाई इंगळे, शिक्षण सभापती सुधीरभाऊ गोळे आदी उपस्थित होते. 

शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार या शाळेत नर्सरी ते तिसरीपर्यंत शिक्षण देण्यात येते. चवथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या अभ्यासक्रमानुसार शिकविले जाते. पुढच्या वर्षी चौथा वर्ग, त्यानंतर पाचवा, सहावा असे १२ व्या वर्गापर्यंत ‘एमआयईबी’चा अभ्यासक्रम लागू होईल. गावाजवळ शाळेला मिळालेल्या ३५ एकर जागेवर नामफलकाचे अनावरणही झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT