कांदेबाग केळी
कांदेबाग केळी 
मुख्य बातम्या

केळीबागेत आंतरमशागती सुरू

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या कांदेबाग जोमात आहेत. सध्या निरभ्र वातावरण असल्याने त्यात मशागत सुरू आहे. वातावरणात गारवा असल्याने आंतर मशागत करून त्याचे सिंचन काही शेतकऱ्यांनी बंद केले आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरपासून कांदेबाग केळी लागवडीस सुरवात केली जाते. चोपडा, जळगाव, भडगाव या तालुक्‍यांमध्ये सर्वाधिक कांदेबाग असतात. रावेर,  यावल, मुक्ताईनगरमध्ये कमी प्रमाणात कांदेबाग लागवड केली जाते. लागवडीसाठी अनेक शेतकरी कंदांना पसंती देत आहे. आणखी महिनाभर कांदेबाग लागवड सुरू राहील.

तापीकाठावर हलक्‍या, पांढऱ्या जमिनीतील कंद अधिक जोमात अंकुरतात आणि वाढतात म्हणून चोपडा, जळगावमधील तापीकाठावरील गावांमध्ये जामनेर, भडगाव येथून केळीचे कंद लागवडीसाठी आणले जात आहेत. वाहतूक व इतर मजुरीसह एक कंद चार रुपयांना पडत आहे.

१६ सप्टेंबरनंतर जळगाव, चोपडा, यावल भागांत परतीचा पाऊस झाल्याने या काळात लागवड केलेल्या कांदेबागाला त्याचा लाभ झाला. कंदांना सिंचनाची गरज नव्हती. अंकुरणाची प्रक्रियाही व्यवस्थित झाली. त्यामुळे नांग्या भरण्याची यंदा फारशी गरज नाही. एरवी १७ ते १८ टक्के कांदेबागांचे कंद वातावरणातील उष्णता व इतर कारणांमुळे अंकुरत नाहीत. ते काढून पुन्हा नवीन कंदांची लागवड करावी लागते. त्यात आणखी खर्च लागतो. पण यंदा नांग्या भरण्याचा खर्च परतीच्या पावसामुळे वाचल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसामुळे कांदेबाग केळीमध्ये तण वाढले होते. ते दूर करण्यासह मुळांना खेळती हवा मिळावी यासाठी वाफसा मिळताच आंतरमशागतीचे काम जिल्ह्यात वेगात सुरू झाले. वाफसा चांगला मिळाल्याने बैलजोडीने मशागत सुकर झाली. शेते भुसभुशीत झाली असून, आता शेतकरी रासायनिक खते देण्याची तयारी करीत आहेत.

सध्या वातावरणात गारवा असल्याने व आंतरमशागतीसाठी अडथळा येऊ नये म्हणून सूक्ष्म सिंचन यंत्रणा हटविली आहे. सध्या तरी सिंचनाची फारशी गरज नाही. काळ्या कसदार जमिनीत बऱ्यापैकी ओलावा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT