पुणे विभागात चाराटंचाईची तीव्रता वाढली
पुणे विभागात चाराटंचाईची तीव्रता वाढली  
मुख्य बातम्या

पुणे विभागात चाराटंचाईची तीव्रता वाढली 

टीम अॅग्रोवन

पुणे ः उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाणीटंचाईची झळ चांगलीच बसू लागली आहे. यामुळे हिरवा चारा मिळत नाही. वाळलेल्या चाऱ्यांचीही टंचाई निर्माण होऊ लागली आहे. सध्या जनावरांसाठी चाऱ्यांचा मोठा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे. नगर, सोलापूर, पुणे या भागांतूनही चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येऊ लागली आहे.

चालू वर्षी पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामात अवघ्या ९१ हजार २१० हेक्टरवर चारापिकांची पेरणी होती. त्यातच साखर कारखाने बंद होऊ लागल्याने हिरवा चाराही महाग झाला असून, तो मिळेनासा झाला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या एक ते दीड महिन्यापासून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर, पुणे या भागात अजूनही छावण्या सुरू झाल्या नसल्या तरी चाराटंचाई सुरू झाली आहे. पुणे विभागात दरवर्षी एक लाखाहून अधिक क्षेत्रावर मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारापिकांची लागवड होत होती. लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. काही शेतकरी उत्पादन झालेला चारा वाळवून तो टप्प्याटप्प्याने वापरतात. त्यामुळे उन्हाळ्यात चाराटंचाई कमी होण्यास मदत होत होती. 

चाराटंचाईमुळे शेतकरी जनावरे विकू लागल्याचे चित्र आहे. यंदा रब्बी हंगामात नगर जिल्ह्यात ३७ हजार ८३० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली. यामध्ये नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यात बऱ्यापैकी चारापिकांची लागवड आहे. मात्र, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, अकोले तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर चारा लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात चाराटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जनावरांसाठी छावण्या उभा करण्यात आल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातही अवघ्या ३० हजार ९७० हेक्टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत अल्प क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, पुरंदर तालुक्यात अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही अत्यंत कमी क्षेत्रावर चारापिकांची लागवड झाली आहे.

माझ्याकडे एकूण १६ जनावरे आहेत. त्यासाठी उसाचे वाडे विकत घेतो. याशिवाय सुका चारा देतो. कारखाने बंद झाल्यामुळे उसाचे वाडे बंद होतील. हायड्रोपोनिक्सच्या माध्यमातून चारा तयार केला जाणार आहे.  - तपन हरचांदे, सोनवडी सुपे, ता. बारामती, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT