मुख्य बातम्या

एका संयुक्त कीटकनाशकावर अकोला जिल्ह्यामध्ये बंदी

Gopal Hage

अकोला : विदर्भात यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये कीटकनाशकांच्या विषबाधेने झालेल्या मृत्यूंमुळे शासन आणि यंत्रणा खळबळून जाग्या झाल्या आहेत. जिल्ह्यात फिप्रोनिल 40 टक्के +इमीडाक्‍लोप्रीड 40 टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे कीटकनाशक शिफारशीत नसल्याने त्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत या कीटकनाशकाची सर्रास विक्री झाली असल्याने यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत.

फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांचे मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी हे संयुक्त कीटकनाशक शिफारशीत नसल्याने जिल्ह्यात विक्रीसाठी बंदी करण्यात येत असल्याचे एका पत्राद्वारे यंत्रणांना कळविले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

झाडाझडती सुरू ‘बनावट कीटकनाशकांचा गोरखधंदा’ हे वृत्त ॲग्रोवनने प्रकाशित केल्यानंतर राज्यस्तरीय यंत्रणेतही खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने कार्यान्वयन यंत्रणा कामाला लागल्या. अकोल्यात स्थानिक अधिकाऱ्यांसह पुण्याचे पथक गोदामांची झाडाझडती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवार (ता. ७)पासून हे पथक चौकशी करीत आहे. विषबाधेच्या प्रकारानंतर अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनीही या संदर्भात बैठक घेत अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत शिफारशीत नसलेल्या कीटकनाशकांची विक्री व्हायला नको हे सांगण्यात आले आहे.

...तर विक्री सुरूच राहली असती? अकोला बाजारपेठेत कीटकनाशकांची कोट्यवधींची उलाढाल होते. याही हंगामात मोठी उलाढाल झाली असून, काही कीटकनाशकांची शिफारस नसतानाही सर्रास विक्री झालेली आहे. आता यवतमाळ प्रकरणामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. आजवर बिनबोभाटपणे ही कीटकनाशके विकली गेली असल्याचे आता बंदी घालण्याच्या कारवाईने शिक्कामोर्तब केले आहे. कदाचित विषबाधा प्रकरणे घडली नसती, तर या घटकांचा समावेश असलेल्या कीटकनाशकांची विक्री सर्रास सुरू राहली असती का, असा प्रश्‍न कृषीतील जाणकारांकडून विचारला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT