crop insurance
crop insurance  
मुख्य बातम्या

पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची माहिती गायब 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांची माहिती पीकविमा पोर्टलवर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ तयार झाला आहे. एक जुलैपासून यंदाच्या हंगामासाठी पीकविमा भरण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी विमा भरण्याचा प्रयत्न केला असता हा मुद्दा समोर आला.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, सोनाळा, लाडणापूर या गावांतील भाग दोनमध्ये येणाऱ्या तसेच एकलारा गावातील काही शेतकऱ्यांची माहिती सध्या पोर्टलवर उपलब्ध नसल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकरी पीकविमा काढण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गावातील काही शेतकरी शुक्रवारी (ता. ३) सीएससी केंद्रावर प्रधानमंत्री पीकविमा योजनेचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पीकविम्याच्या साइटवर या चार गावांतील शेतकऱ्यांची नावेच नव्हती. गट क्रमांक, सर्व्हे क्रमांक टाकला तर त्याठिकाणी दुसऱ्या व्यक्तींची नावे येत आहेत. या भागातील शेतकरी फळपीक विमा उतरविण्यासाठी घाई करीत आहेत. परंतु, पीकविमा काढण्याच्या शेवटच्या टप्प्यात ही तांत्रिक अडचण समोर आल्याने गोंधळ वाढला आहे.  याबाबत काही शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाला माहिती दिली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेचे बुलडाणा जिल्ह्याचे काम रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे आहे. ही चूक नेमकी कोणाकडून झालेली आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.  गेल्या हंगामात सोनाळा येथील भाग दोनची माहिती दिसत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. या वेळी पुन्हा सोनाळासह इतर तीन गावांतील शेतकऱ्यांबाबत असेच घडलेले आहे. प्रतिक्रिया... तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती दिली आहे. तसेच कृषी आयुक्तालयाकडेही गेल्या १५ दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.  - अमोल बनसोडे, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT