रेशीम शेडमध्ये ‘उझी’ माशीचा प्रादुर्भाव  Infestation of ‘Uzi’ fly in silk shed 
मुख्य बातम्या

रेशीम शेडमध्ये ‘उझी’ माशीचा प्रादुर्भाव 

जालनाजिल्ह्यातील काही गावांमधील रेशीम कोष उत्पादन शेडमध्ये ‘उझी’ माशीचा शिरकाव झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे.

टीम अॅग्रोवन

जालना : जिल्ह्यातील काही गावांमधील रेशीम कोष उत्पादन शेडमध्ये ‘उझी’ माशीचा शिरकाव झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. जालना जिल्हा मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादक जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्हा आहे. जिल्ह्यात सुमारे ९७३ शेतकरी आपल्या ९८० एकरांवरील तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम कोष उत्पादन करतात. परंतु यंदा रेशीम कोष उत्पादनाची सुरुवात होत असतानाच उत्पादकांसमोर उझी माशीचे संकट उभे राहिले आहे. मराठवाड्यात एप्रिल-मे महिन्यांत उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. या माशीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणत: दोन महिने रेशीम कोष उत्पादन बंद ठेवण्याची सूचना रेशीम विभागाकडून करण्यात आली होती. या वेळी ‘ॲग्रोवन’नेही उझी माशीच्या प्रादुर्भावाबाबत रेशीम कोष उत्पादकांना सावध केले होते. परंतू आता पुन्हा जुलैमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कोष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे.  शेवली, पानेवाडी, बाणेगाव आदी गावांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पानेवाडीतील रेशीम कोष उत्पादनाच्या दोन शेड उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे बंद केल्या. या शेडमधील रेशीम कोष उत्पादन बंद केले असले तरी त्यामधून उझी माशीचा प्रसार इतरत्र झाला. ज्यांनी नियंत्रणासाठी उपाय योजना केली त्यांच्या शेडमध्ये कमी आणि ज्यांनी उपाय योजना केल्या नाहीत, त्यांच्या शेडमध्ये ४० ते ५० टक्क्‍यांपर्यंत नुकसान झाले असल्याची माहिती रेशीम कोष उत्पादक चांगदेव मोहिते यांनी दिली.   

‘उझी’ नियंत्रण शक्य  साधारणत: १९८१-८२ पासून महाराष्‍‌ट्रात उझी माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.३६ ते ४४ दिवसांपर्यंत जीवनचक्र असलेली उझी माशी साधारणपणे ३०० अंडी घालते. वर्षभर उपाय न करता एकामागून एक रेशीम कोष उत्पादनाच्या बॅच घेतल्यामुळे उझी माशीची संख्यात्मक वाढ व प्रसार होतो. त्यामुळे एप्रिलमध्ये प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणासाठी कोष उत्पादन दोन महिने थांबविण्याची सूचना केली होती. १० ते ३३ टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान करू शकणाऱ्या उझी माशीचे भौतिक, रासायनिक व जैविक पद्धतीने नियंत्रण करता येते, अशी माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली.  प्रतिक्रिया  

उझी माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापासून नियंत्रण मिळविण्यासाठी मच्छरदाणीचा वापर, उझीनाशकाचा वापर आणि जैविक पद्धतीने नियंत्रणाचा प्रयत्न माझ्यासह सर्व शेतकरी करीत आहेत.  - गजानन भाकड, पानेवाडी. जि. जालना 

प्रतिक्रिया   पहिल्या बॅचचे नुकसान झाल्यानंतर दुसरी बॅच घेतली. त्यामध्ये थोडे बहुत उत्पन्न मिळाले. पण अलीकडे दीडशे अंडीपुंजाची तिसरी बॅच मोठ्या प्रमाणात उझी प्रादुर्भावग्रस्त झाल्याने पुढील बॅच न घेण्याचा निर्णय घेतला आहे.  -आझम शेख, शेवली. ता. जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT