नेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य
नेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य 
मुख्य बातम्या

नेदरलॅंडचे भारताबरोबर कृषी संशोधनासाठी सहकार्य

टीम अॅग्रोवन

बारामती, जि. पुणे : भारतातील चौथ्या क्रमांकाचा परकीय गुंतवणूकदार देश असलेल्या नेदरलॅंडचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, १५ खात्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तब्बल २२० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ २३ ते २५ मे या कालावधीत भारतात येत आहे. कृषी विकासातील सर्वांत मोठे करार वर दौऱ्यादरम्यान होणार आहेत. या दौऱ्याचा समारोप बारामतीतील सेंटर फॉर एक्सलंस-डेअरी या केंद्राच्या भूमिपूजनाने होणार आहे. डच पंतप्रधान मार्क रूट, उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन आणि त्यांचे शिष्टमंडळ २३ मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. संपूर्ण देशात नेदरलॅंड कृषी, स्मार्ट सिटी, जलव्यवस्थापन, आरोग्य आणि संशोधन व विकास या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. त्याचे विविध करार वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले जाणार आहेत. हरियानात गुडगाव येथे फुलबाजार, कर्नाल येथील महाराणा प्रताप फलोत्पादन विद्यापीठातही सफरचंदाच्या उच्च, दर्जेदार व उत्पादनवाढीसाठी प्रकल्प आणि महाराष्ट्रात बारामती येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत राज्यातील सर्वांत मोठा व भविष्यातील दुग्धोत्पादनात आशादायक क्रांती आणणारा सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी हा गुणवत्तापूर्ण गोवंश सुधार प्रकल्प उभा राहणार आहे.      भारत नेदरलॅंडकडून शेती तंत्रज्ञान, कृषी संशोधनातील देवाणघेवाण, उच्च प्रतीचे बियाणे निर्मिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहे. भारतातील शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याच्या दृष्टीने नेदरलॅंडकडून हे सहकार्य घेतले जाणार आहे. भारतातील सफरचंद पाच वर्षांत उत्पादनायोग्य होतात, मात्र नेदरलॅंडमध्ये सफरचंदाचे उत्पादन ११ महिन्यांतच मिळू लागते, भारतातील टोमॅटोसारख्या पिकांना १ चौरस मीटरमध्ये १० किलोपर्यंत उत्पादन मिळते, मात्र तेवढ्याच क्षेत्रफळात ५० किलोपर्यंत उत्पादन मिळविणाऱ्या जाती व पीक तंत्र नेदरलॅंडने विकसित केले आहे. ते भारतात विकसित करण्यासाठी अगोदरच काही करार झालेले आहेत. आता २३ मे ते २५ मेपर्यंत नव्याने आणखी मोठे करार करून भारतीय शेतीत क्रांती करण्याचे पाऊल उचलले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT