अकोला जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा,पाणीसमस्येचा तडाखा
अकोला जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा,पाणीसमस्येचा तडाखा 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा, पाणीसमस्येचा तडाखा

टीम अॅग्रोवन

अकोला : तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचल्याने नागरिकांना जसा त्रास होत आहे, तशीच अवस्था शेतीचीसुद्धा झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे या भागातील फळबागांवर विविध परिणाम होऊ लागले आहेत. उन्हाचा तडाखा फळे झेलू शकत नसल्याचे चित्र आहे. 

उन्हाच्या झळा वाढल्याने या भागातील केळी, संत्रा, लिंबू यासह विविध फळपिकांवर परिणाम होऊ लागला. केळीचा दुय्यम दर्जाचा माल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे भाव कमी मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. संत्र्याचा हंगाम काही ठिकाणी आटोपला तरी झाडांना या उन्हाचा फटका बसू शकतो. लिंबाचा बहर सध्या सुरू आहे; परंतु फळे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.    

आधीच या वर्षी विहिरींतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा, अकोट या तालुक्यात पूर्वी जेथे ८० ते ९० फुटांवर विहिरीला पाणी मिळायचे, आज त्याच विहिरीमधून १२० फुटांवरूनही पाणी मिळेनासे झाले. कूपनलिकांचीही अशीच स्थिती बनली.  

काही शेतकऱ्यांकडील पाणी पूर्णतः आटले आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण झाली आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी फळबागांना काटकसरीने पाणी देत त्या जगवित आहेत; परंतु वाढत्या उन्हाचा तडाखा हा झेपावणारा नाही. येत्या काही दिवसांत या भागातील तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी मे महिन्यात ४४ अंशांपेक्षा अधिक तापमान राहते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT