आवक वाढल्याने हापूस दराला फटका Increased inflows hit the hapus rate
आवक वाढल्याने हापूस दराला फटका Increased inflows hit the hapus rate 
मुख्य बातम्या

आवक वाढल्याने हापूस दराला फटका

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः दुसऱ्‍या टप्प्यातील आंबा फळबाजारात जाण्यास सुरुवात झाली असून, नवी मुंबईच्या बाजार समितीत हापूसची आवक वाढली आहे. पाठोपाठ कोरोनामुळे पुरवठा अधिक आणि ग्राहक कमी यामुळे हापूसचे दर आठवडाभरात दोन हजार रुपयांनी खाली आले आहेत. अचानक दर घसरल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दर टप्प्यात आल्यामुळे स्थानिक बाजारात अनेकांनी हापूसची चव चाखण्यास सुरुवात केली.

उत्पादन कमी आणि ग्राहकांकडून मागणी अधिक असल्यामुळे यंदा हापूसचा दर एप्रिलच्या मध्यापर्यंत वधारलेला होता. पहिल्या टप्प्यात पंधरा ते वीस टक्केच उत्पादन आले होते.

दुसऱ्‍या टप्प्यातील उत्पादन मागील चार दिवसांत सुरू झाले आहे. परिणामी, वाशी फळ बाजारात प्रतिदिन ३४ ते ४५ हजार पेटी जात आहे. सध्या शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. संचारबंदीमुळे बहुतांश लोक बाहेर पडत नाही. नियमानुसार सकाळी ७ ते ११ या कालावधीत व्यापाऱ्‍यांना विक्रीसाठी मुभा दिली आहे. 

सकाळच्यावेळी ग्राहक कमी असतो. तसेच हापूसच्या बरोबरीने कर्नाटकमधील आंबाही मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून, ३५ ते ४० रुपये किलो दर आहे. या सर्वांचा परिणाम हापूसच्या दरावर होत आहे. ग्राहकांची मागणी असलेल्या पाच ते सहा डझनाच्या पेटीचा दर सर्वसाधारणपणे ४ ते ५ हजार रुपये होता. या आठवड्यात तो ३ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्या खालोखाल दर्जा कमी असलेल्या आंब्याचा दर १ हजार रुपयांपर्यंत खाली आला. चार दिवसांत ही घसरण झाल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हापूसचे दर कमी होतात; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात दर खाली येत नाहीत. व्यापाऱ्‍यांवर मदार दर्जेदार आंब्याला अजूनही दर मिळत आहे. अहमदाबाद, पुण्यातून थेट बागायतदारांकडे मागणी येत असून, त्याला दर योग्य मिळतोय. तिकडे खायला आंबा नाही. सर्वसामान्य व्यक्ती खरेदीसाठी बाहेर पडत नसल्याने फळबाजारात आंबा साळून राहतो. बाजार समित्यांमधील व्यावसायिकांनी हा दर स्थिर ठेवणे आवश्यक असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया छोट्या-मोठ्या शहरातही टाळेबंदीचे कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी फिरकत नाही. मागील वर्षापेक्षा यंदा रुग्ण अधिक असल्याने जिल्हा बंदी होत आहे. मागील आठवड्यातील तयार माल विकला जात नाही. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती नवी मुंबई

प्रतिक्रिया

दर कमी आल्याने शेवटच्या टप्प्यात मिळणाऱ्‍या नफ्याला मुकावे लागेल. यंदा अनियमित वातावरणामुळे औषधांची फवारणीही अधिक झाली. त्यावर खर्च करावा लागला. तो भरून निघण्यासाठी व्यावसायिकांनी दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. - राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन , हरभरा, तूरीचे काय आहेत दर ?

Agriculture Update : फळपिकांना बाल्यावस्थेत वळण देणे फायदेशीर

Agriculture Update : केवळ वाणच नाही, तर लागवड पद्धतही महत्त्वाची

Maharashtra Rain : पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढणार; राज्यभरात पुढील ५ दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Crop Advisory : आंबा, नारळ, सुपारी पीक सल्ला

SCROLL FOR NEXT