मराठवाड्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ
मराठवाड्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात सरासरी क्षेत्राच्या पुढे जावून सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरीत सातही जिल्ह्यात सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरणीने सरासरी क्षेत्राचा आकडा ओलांडला आहे. १२ लाख ३४ हजार ५०७ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १७ लाख ५२ हजार ६९५ हेक्‍टरवर सोयाबीन आहे, असे जुलैअखेरच्या कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्याच्या औरंगाबाद कृषी विभागात यंदाच्या खरिपासाठी २ लाख ३३ हजार २ हेक्‍टरवर सोयाबीनचे सरासरी क्षेत्र होते. त्या तुलनेत ३ लाख ७४ हजार ९१० हेक्‍टरवर अर्थात सरासरीच्या १६० टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन आहे.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या पाच जिल्ह्यांच्या लातूर कृषी विभागांतर्गत १० लाख १ हजार ५०५ हेक्‍टरवर सोयाबीनचे सरासरी क्षेत्र होते. त्या तुलनेत या पाचही जिल्ह्यांत १३ लाख ७८ हजार २०५ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली. लातूर कृषी विभागात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १३७ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन आहे. 

बीड जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याआधी साधारणपणे परळी, अंबाजोगाई व केज तालुक्‍यातील काही भागांतच प्राधान्याने सोयाबीनची पेरणी केली जायची. पावसाचे दिवसेंदिवस कमी होत असलेले प्रमाण, कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे कायम असलेले संकट पाहता, शेतकरी कमी कालावधीच्या सोयाबीन पिकाकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे. सोबतच साडेतीन महिन्यात सोयाबीन पीक काढल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा रब्बीचा हंगाम सापडण्याची संधी असल्याची बाब कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना समजविण्यात आली. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय सोयाबीनचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

जिल्हा  सरासरी  प्रत्यक्ष टक्‍केवारी
औरंगाबाद १७६२७  १०३२५  ५८.५७
जालना ९५८६१ १२५९३६ १३१.३७
बीड ११९५१४ २३८६४९  १९९.६८
लातूर ३२४३३५   ३४१५०९  १०५.३०
उस्मानाबाद ११४३३४ २५६.४९ २२३.९५
नांदेड  २३९४९८   ३३८२७६ १४१.२४
परभणी  १६४३५६ १९२.६४  ११६.८६
हिंगोली १५८९८२ २५०३०७ १५७.४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT