Increase the number of pumps on demand in Jat taluka
Increase the number of pumps on demand in Jat taluka 
मुख्य बातम्या

जत तालुक्यात मागणीनुसार पंपांची संख्या वाढविणार

टीम अॅग्रोवन

सांगली : ‘‘म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात १३५ क्युसेकने सोडण्यात आले आहे. जत तालुका पूर्ण दुष्काळी असला, तरी मागणी असलेल्या भागातून प्राधान्यक्रम लावला आहे. पाण्याची मागणी लक्षात घेऊन पंपांची संख्यादेखील वाढविण्याचा विचार सुरू आहे. त्याचे नियोजन सुरू केले आहे,’’ अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन वीस ते पंचवीस दिवस झाले. सध्या या योजनेचे पाणी मुख्य कालव्यातूनच योजनेच्या शेवटच्या लाभक्षेत्राकडे जात आहे. योजनेचे पाणी पोटकालव्यांनी सोडले नाही. त्यामुळे जत तालुक्यात हे पाणी लवकर पोचले आहे. कुची येथून बोगद्यातून पाणी जत तालुक्याकडे जाते. त्यानुसार बोगद्यातून बाहेर आल्यानंतर हिवरे येथून जत तालुक्यातील पाण्याचा प्रवास सुरू होतो. हिवरे, बागेवाडी हद्द ओलांडून पाणी सध्या कुंभारी येथील तलावात सोडले जात आहे.

कुंभारी येथील दोन्ही तलावातील पाण्याबाबत मागणी यापूर्वीच आली असल्याने पाणी सोडण्यात येत आहे. त्यांनतर पुढे जत नगरपालिका मागणी व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यानुसार बिरनाळ तलावातही लगेच पाणी सोडण्यात येणार आहे.

जत तालुक्यात पाणी सोडले असले, तरी अद्याप मिरज तालुक्यातील डोंगरवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी, तासगाव तालुक्यातील विस्तारित गव्हाण व मूळ गव्हाण या उपसासिंचन योजना सुरू केल्या नाहीत. पण, या सर्व योजना दोन दिवसांनंतर म्हैसाळ योजनेच्या मागील पाच टप्प्यांतील पंप संख्यावाढीबरोबर सुरू करण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले. 

पाण्याचा वेग १५० ते २०० क्युसेक

म्हैसाळ योजनेच्या पाचही टप्प्यांतील पंपसंख्या वाढविण्याबाबत मेकॅनिकल विभागासोबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पंपसंख्या वाढविण्यासह जत तालुक्यात सध्या १३५ क्युसेक असलेला पाण्याचा वेग १५० ते २०० क्युसेक करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT