‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची  ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना To increase investment in Mihan Suggestion from Energy Minister Nitin Raut 
मुख्य बातम्या

‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना

टीम अॅग्रोवन

नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. मिहान येथे डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. या प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूक क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे (एमएडीसी) तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार,  भंडारी, मिहान इंडस्ट्रिअल असोसिएशनचे मनोहर भोजवानी, ऊर्जा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत मिहान प्रकल्प गतिशील करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद, मुंब्रा, इंदोर, विशाखापट्टणम व भारतात ज्या-ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. त्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गटांचे गठण करा. प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी. या बैठकीमध्ये लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्यात यावे, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाइल्स, लॉजिस्टीक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ, आदी विषयांवर धोरण ठरवता येईल.  अनेक उद्योग संस्थांना नागपूर हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे उद्योग जगतातील मान्यवरांचे ‘अॅडव्हन्टेज विदर्भ’ किवा विदर्भात गुंतवणुकीची संधी, अशा आशयाचे गुंतवणूक संमेलन नवी दिल्ली व मुंबई येथे आयोजित करण्यात यावे. जेणेकरून मिहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या शहरातील उद्योग समूहांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना या प्रकल्पाबाबतची माहिती मिळेल. मात्र, हे संमेलन घेण्यापूर्वी मिहान येथे गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या जातील, याची आश्वासक तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.मिहानसारखा प्रकल्प हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून, यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT