Increase in discharge from Yeldari, Siddheshwar dam
Increase in discharge from Yeldari, Siddheshwar dam 
मुख्य बातम्या

येलदरी, सिद्धेश्वर धरणातून विसर्गात वाढ

टीम अॅग्रोवन

परभणी ः पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्यामुळे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणे शंभर टक्के भरली आहेत. सोमवारी (ता. १७) सकाळ पासून येलदरी धरणाचे सर्व दहा आणि सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्गात वाढ होऊ शकते त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळी येलदरी धरणामध्ये एकूण ९३४.४४० एमएमक्युब पाणीसाठा होता. त्यापैकी ८०९.७७० एमएमक्युब (१०० टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. आजवरच्या पावसाळ्यात १ जून पासून येलदरी धरणाच्या ठिकाणी ५५९ मिमी पाऊस झाला.गतवर्षी यावेळी ४१३ मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या एक जून पासून येलदरी धरणात एकूण ४१८.०१८ एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२.३२० एमएमक्युब पाण्याची आवक झाली. आजवर २.२७५ एमकेडब्लूएच एवढी वीज निर्मिती झाली आहे. रविवारी (ता. १६) रात्री धरणाचे सव्वा दहा वाजता ६ दरवाजे अर्धामीटरने उघडून १२६५९ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु पाण्याची आवक वाढल्यामुळे रविवारी (ता. १७) सकाळी साडे आठ वाजता सर्व दहा दरवाजे उघडून २९४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मासोळी प्रकल्पामध्ये ७२ टक्के उपयुक्त साठा परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये ८४.६७ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ७३.७७ टक्के, मुळी बंधाऱ्यात ९.४४ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ६८.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात १०० टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT