Include papaya in crop insurance scheme
Include papaya in crop insurance scheme 
मुख्य बातम्या

`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे क्षेत्र आहे. नंदुरबार जिल्हा पपईसाठी प्रसिद्ध असून, या जिल्ह्यात क्षेत्र वाढून ते पाच हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे. पपई पिकात अनेक रोगांच्या समस्या व नैसर्गिक आपत्तीचे संकट असते. यामुळे या पिकाचा समावेश फळ पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

यासंदर्भात शेतकरी प्रकाश पाटील व इतरांनी कृषिमंत्री आणि इतर प्रशासनातील मंडळीला निेवेदन दिले आहे. पपईचे क्षेत्र खानदेशात वाढले आहे. पूर्वी फक्त चार ते पाच हजार हेक्टरवर पपई असायची. शासनाने अलीकडे प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी पिकाचा फळ पीक विमा योजनेत समावेश केला आहे. असाच समावेश पपईचादेखील करायला हवा. पपईवरही विषाणूजन्य रोग येतात. विषम वातावरणामुळे अनेकदा पीक काढून फेकावे लागते. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान होत असते. 

नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर पपई आहे. जळगावातही सुमारे चार हजार आणि धुळ्यातही सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर पपई आहे. खानदेशात एकट्या शहादा तालु्क्यात यंदा ३३९५ हेक्टरवर पपईचे पीक आहे. जळगावात चोपडा, यावल, रावेर हे तालुके पपई लागवडीत आघाडीवर असतात. पपईला विमा संरक्षण मिळाले, तर शेतकऱ्यांना पिकासंबंधी हमी, विश्वास तयार होईल. नुकसान कमी होईल, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.  पपईला विषाणूजन्य रोगांचा विळखा असतो. लाखो रुपये किडनाशकांवर खर्च करावे लागतात. अनेकदा व्यापारी मनमानी करून नुकसान करतात. यामुळे पीक परवडत नाही. पिकाचा समावेश विमा योजनेत करायला हवा.  - राकेश पाटील, शेतकरी, बामखेडा (जि.नंदुरबार) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT