Illegal loan cases Notice of NABARD
Illegal loan cases Notice of NABARD 
मुख्य बातम्या

बेकायदा कर्जप्रकरणी ‘नाबार्ड’ची नोटीस

टीम अॅग्रोवन

सांगली ः सांगली जिल्हा बँकेकडून बेकायदा कर्जप्रकरणी नाबार्ड व सहकार आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. या बाबत तातडीने खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बड्या संस्थांच्या ‘राइट ऑफ’वरून गदारोळ झाला असताना नाबार्डने नोटीस बजावल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मागील काही वर्षांमध्ये अनेक कारखानदार, संस्थांना बेकायदा कर्जपुरवठा केला असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी अ‍ॅड. वांगीकर यांच्यामार्फत केली होती. बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांनी अनेक कामे बेकायदा केली असल्याची तक्रारही केली होती. नाबार्डने याची गंभीर दखल घेतली आहे. या बाबत नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक प्रशासन व संचालक मंडळास नोटीस बजावली आहे. 

या नोटिशीत आमच्याकडे अ‍ॅड. वांगीकर यांनी केलेल्या तक्रारीबाबत आपण तातडीने खुलासा करावा, असे नाबार्डने स्पष्ट केले आहे. या बरोबरच सहकार आयुक्तांनीही या बाबतच्या तक्रारीची दखल घेत बँकेला विचारणा केली आहे. या विषयी लेखी खुलासा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, बड्या नेत्यांची कर्जे राइट ऑफ व ओटीएस करण्यावरून जिल्हा बँकेबाबत तक्रारी सुरू आहेत. शेतकऱ्यांकडून कडक वसुली करणारे बँकेचे संचालक मंडळ साखर कारखानदारांवर मेहेरनजर दाखवीत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. या बाबत आंदोलनेही होऊ लागली आहेत. त्यातच नाबार्डने नोटीस दिल्याने बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : गव्हाचे भाव टिकून ; कापूस, सोयाबीन, मका, तसेच कांद्याचे काय दर आहेत?

Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता 

Farm Enumeration : शेतमोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सक्ती

Heavy Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच

Agriculture workshop : पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय करा : ढगे

SCROLL FOR NEXT