इगतपुरी तालुक्यात भात लागवडीस वेग
इगतपुरी तालुक्यात भात लागवडीस वेग 
मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यात भात लागवडीस वेग

टीम अॅग्रोवन

घोटी, जि. नाशिक  : भातपिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे बळिराजा शेतीकामात व्यस्त झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.

इगतपुरी तालुक्यात मागणीपेक्षा अधिक खतांचा पुरवठा झाला असल्याने तालुक्यात त्याचा  तुटवडा नसल्याचे पंचायत समिती कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.  मध्यंतरी पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतल्याने या कालखंडात नागली आणि वरई या पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणातील मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांचा बागायती पिके घेण्याकडे कल आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भातपिकाऐवजी बागायती पिके घेण्यासाठी अनेक हेक्टर क्षेत्र पडीक ठेवतात. यामुळे खरिपाच्या लागवडीत काही वर्षांपासून घट झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT