‘आयसीएआर’ने टॉपर विद्यार्थ्यांनाही एमएस्सीसाठी प्रवेश नाकारले
‘आयसीएआर’ने टॉपर विद्यार्थ्यांनाही एमएस्सीसाठी प्रवेश नाकारले 
मुख्य बातम्या

‘आयसीएआर’ने टॉपर विद्यार्थ्यांनाही एमएस्सीसाठी प्रवेश नाकारले

मनोज कापडे

पुणे ः खासगी विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर (एमएस्सी) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश न देण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने घेतला आहे. आयसीएआरच्या सीईटीत गुणवत्ता यादीत असूनही प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी हादरले आहेत.  पदव्युत्तर (एमएस्सी) अभ्यासक्रमांसाठी देशातील कृषी विद्यापीठांना भारतीय कृषी संशोधन परिषदेसाठी (आयसीएआर) काही जागा राखीव ठेवाव्या लागतात. या जागा भरण्यासाठी `आयसीएआर’कडून सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाते. महाराष्ट्रात यंदा ८८० जागा असून, आयसीएआरसाठी २५ टक्के जागा राखीव आहेत.  ‘आयसीएआर’ कोट्यातून एमएस्सी प्रवेश देण्यासाठी यंदा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. मात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर “तुमच्या खासगी कॉलेजला अधिस्वीकृती नसल्याने प्रवेश मिळणार नाही,” अशी भूमिका घेतली गेली. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांपैकी अभिजित जाधव याने दिल्लीत आयसीएआरच्या परीक्षा नियंत्रकाकडे दाद मागितली. “आमच्या विद्यापीठाला अधिस्वीकृती असताना व ‘आयसीएआर’ सीईटीत मी टॉपर असताना हा नियम लावू नका,” असे सांगूनही नियंत्रकाने मात्र ऐकले नाही. राज्यातील दुसरा एक टॉपर विद्यार्थी आकाश एकतपुरे यालाही देखील प्रवेश नाकारला गेला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेण्यासाठी तो दिल्लीत तळ ठोकून आहे.  राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या म्हणण्यानुसार, “एमएस्सीसाठी ‘आयसीएआर’ची अधिस्वीकृती केवळ ३३ घटक व अनुदानित महाविद्यालयांनाच आहे. याच राखीव जागांवर प्रवेश देण्याची तरतुद आहे. त्यामुळे हा मुद्दा आमच्या कक्षेत नसून ‘आयसीएआरने’च तोडगा काढायला हवा.” आम्ही जबाबदार नाही ः ‘आयसीएआर’ काही विषय व अभ्यासक्रमांबाबत संबंधित विद्यापीठांचे वेगळे निकष असू शकतात. अधिस्वीकृतीचे नियम देखील विद्यार्थ्यांनी तपासावे असे आम्ही सांगितलेले आहे. केवळ अधिस्वीकृतीधारक विद्यापीठे व संस्थांनाच आमच्या कोट्यातून प्रवेश दिला जाईल हे आधी स्पष्ट केले गेले होते. त्यामुळे या समस्येला आम्ही जबाबदार नाही. कारण, नियम मोडून प्रवेश देता येणार नाहीत, असे ‘आयसीएआर’च्या सूत्रांचे म्हणणे आहे.  प्रतिक्रिया राहुरी विद्यापीठाच्या मी पदवीधर आहे. ‘आयसीईआर’च्या सीईटीत मी प्रावीण्य मिळवले. मला एमएस्सीसाठी ‘आयसीएआरने’च जागावाटप व पात्रता प्रमाणपत्र दिले. त्यामुळे मी दिल्लीत भारतीय कृषी शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी गेलो. मात्र बिगर अधिस्वीकृतीधारक महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेतले, असे कारण दाखवून मला परत पाठविले. शेतकरीपुत्रांवर हा अन्याय आहे. - अभिजित जाधव, आयसीएआर सीईटीत रॅंक-३, मोकाशी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT