The hurricane did not compensate the farmers
The hurricane did not compensate the farmers 
मुख्य बातम्या

चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाहीच

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता राज्य सरकारने २५ कोटी रुपये जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात २५ लाख देखील प्राप्त झालेले नाहीत. एवढेच नव्हे शेतकऱ्यांना नुकसानीपोटी रोपे देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याचा आरोप सदस्य रणजीत देसाई यांनी येथे केली.

जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या ऑनलाइन सभेला जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सुधीर नकाशे, गणेश राणे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सांवत, प्रितेश राऊळ आदी उपस्थित होते.

जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात देखील झाला. या चक्रीवादळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीकरिता जुलैमध्ये राज्य शासनाने २५ कोटीचा निधी जाहीर केला. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे का असा प्रश्न श्री. देसाई यांनी उपस्थित केला. परंतु अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. यावेळी श्री. देसाई यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार २५ कोटी पैकी २५ लाख रुपये देखील जिल्ह्याला मिळालेले नाहीत. सरकारने जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी त्यांना काही झाडांची रोपे दिली जात आहे. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. यावेळी राज्य शासनाच्या वतीने सदस्य अमरसेन सांवत यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.परंतु सत्ताधारी पक्षाच्या सर्व सदस्यांनी शेकडो प्रश्न उपस्थित करीत त्यांना एकटे पाडले. शासनाने सर्वच विभागाच्या निधीला कात्री लावली आहे, अशी टीका देखील पदाधिकाऱ्यांनी केली. या सर्वाला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील श्री. देसाई यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT