नगर जिल्ह्यातील चौदा गावांत होणार शंभर टक्के ठिबक
नगर जिल्ह्यातील चौदा गावांत होणार शंभर टक्के ठिबक 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील चौदा गावांत होणार शंभर टक्के ठिबक

टीम अॅग्रोवन

नगर : जमिनीचे आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार खत मात्रा देण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका अभियानातंर्गत निवडलेल्या प्रत्येक तालुक्यातील एका गावात पाणी व्यवस्थापनासाठी शंभर टक्के ठिबक वापर व्हावा, यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. याशिवाय कृषी विभागाच्या योजनांही येथे राबविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. राज्यात पहिल्यांदाच नगरमध्ये असा प्रयोग केला जात आहे. 

कोणतेही पीक घेताना जमिनीला संतुलित खत मात्रा मिळावी, कोणत्या जमिनीला कोणत्या खताची गरज आहे, हे कळावे यासाठी मृद आरोग्य पत्रिका अभियान काही वर्षांपासून राबवले जात आहे. त्याचा बऱ्याच भागात फायदाही झाला आहे. त्या अनुषंगाने यंदा प्रत्येक तालुक्यात एक गाव निवडून तेथे शंभर टक्के आरोग्य पत्रिकाचे वाटप व्हावे, असा उपक्रम राबविण्याचे शासनाचे आदेश आहेत.

 त्यानुसार जिल्ह्यात कामही सुरू आहे. मात्र, या उपक्रमासोबत कृषी विभागाच्या अन्य योजनाबाबतही निवडलेल्या गावांत उपक्रम राबविण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. 

यंदाच्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. शंभर टक्के ठिबकचा वापर झाल्यास ११ हजार ४४८ हेक्टर  क्षेत्र, ११ हजार ८०३ शेतकऱ्यांना फायदा होईल.

निवडलेली गावे अशी

पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा), चांदे खुर्द (ता. कर्जत), चेडे चांदगाव (ता. शेवगाव), शिंगवे तुकाई (ता. नेवासा), जखणगाव (ता. नगर), वाघापूर (ता. अकोले), सावरगाव (ता. जामखेड) येसगाव (ता. कोपरगाव), सिरसगाव (ता. श्रीरामपूर), पिंपळगाव टप्पा (ता. पाथर्डी), - टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर), लोणी बुद्रुक (ता. राहाता), मंगळापूर (ता. संगमनेर), जातप (ता. राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT