pomegranate
pomegranate  
मुख्य बातम्या

एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट 

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली तरी फलोत्पादन अभियानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा एक लाख हेक्टरवर नव्या बागा उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. कोविड स्थितीला गेल्या दोन वर्षांपासून कृषी खात्याचे कर्मचारी सामोरे जात आहेत. गेल्या हंगामात मार्चपासून साथीचा फैलाव व लॉकडाउनचे संकट उभे राहिले. या स्थितीत देखील ३७ हजार ५०० हेक्टरपर्यंत राज्यात नवी लागवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख रुपये अनुदान वाटण्यात आले. यंदा लागवडदेखील मोठी आणि अनुदानवाटप देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा वाटप होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  राज्यात यंदा जिल्ह्यानिहाय होणाऱ्या नव्या फळबाग लागवडीचे नियोजन असे: (आकडे हेक्टरमध्ये) ठाणे १६२०, पालघर २७००, रायगड ४१४०, रत्नागिरी ५०४०, सिंधुदुर्ग ५०४०, नाशिक ५०४०, धुळे १९२०, नंदूरबार २२८०, जळगाव २१७०, नगर ५०७०, पुणे ४४४०, सोलापूर ५०४०, सातारा ३८००, सांगली २८१०, कोल्हापूर २९५०, औरंगाबाद ३५८०, जालना २५२०, बीड ३०६०, लातूर २६००, उस्मानाबाद २४२०, नांदेड ३३८०, परभणी २६४०, हिंगोली १३९०, बुलडाणा ३२३०, अकोला २०८०, वाशीम १७२०, अमरावती ४०८०, यवतमाळ ३६१०, वर्धा २०४०, नागपूर २६४०, भंडारा १४४०, गोंदिया १२३०, चंद्रपूर २२४०, गडचिरोली १६००.  फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आणि त्यांच्यापर्यंत योजनेची वैशिष्ट्ये पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर देण्यात आली आहे. कोकण विभागातील ११२८ कृषी सहायकांना प्रत्येकी १५ हेक्टरपर्यंत नवी लागवड होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांतील ८३०२ सहायकांना प्रत्येकी १० हेक्टरवर लागवड करण्याबाबत कामे करावी लागतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  राज्यातील फळबाग लागवड (हेक्टर) आणि अनुदानावरील खर्च (कोटींत) 

वर्ष लागवड खर्च 
२०१८-१९ १२१८३ ८० 
२०१९-२० १७३११ ८३ 
२०२०-२१ ३७५०० १२१.६४ लाख 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT