home to home treatment on Animals by doctors in Sangli district
home to home treatment on Animals by doctors in Sangli district 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात डॉक्टरांकडून पशुधनावर उपचार

टीम अॅग्रोवन

सांगली  : जिल्ह्यातील १३ लाख १७ हजार ८६६ पशुधनांना देण्यासाठी लसीसह जनावरांना लागणाऱ्या औषधांचा साठा पशुवैद्यकीय दवाख्यान्यात आला आहे. संचारबंदीतही डॉक्टरही घरोघरी जाऊन पशुधनावर उपचार करत आहेत. परंतू, संचारबंदी लसीकरणाला अडथळा ठरत आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवेवर परिणाम होत आहे. 

जिल्हा परिषद पशुवैद्यकीयचे १०३ दवाखाने असून पशुधन उपायुक्त कार्यालयाचेही दखावाने आहेत. गाई, म्हैशी व शेळ्या-मेंढ्या यांना घटसर्प, फऱ्या, यासह अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पशुधनाचे पशुवैद्यकीय शिबीर घेवून लसीरकरण केले जाते. त्यानुसार लसी आणि औषधांची मागणी केली होती. ही औषधे पशुवैद्यकीय दवाखान्यात आली आहेत. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव राज्यात झाला. त्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्हातील वाहतूक बंद केली. संचार बंदी लागू करण्यात आली असल्याने लसणीकरणाला अडचणी निर्माण झाली. त्यामुळे जनावरांना लसीकरण वेळेत करणे मुश्कील झाले. 

जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाकडील ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचारावरही होत आहे. वाळवा, पलूस, शिराळा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात दूध संघ आणि खासगी डेअरी चालकांचे डॉक्टरही कार्यक्षेत्रात लसीकरण करुन घेत आहेत.

जिल्ह्यात संचार बंदी आहे. परंतू, लसीकरण आणि जनावरांचे आरोग्य तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जावूनच लसीकरण आणि तपासणी सुरु केली आहे. परंतू, जरी घरी जावून तपासणी आणि लसीकरण होत असले, तरी लसणीकरण करण्यास संचार बंदी अडथळा ठरत आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT