Hivare bajar Balanced arrangement of agricultural water
Hivare bajar Balanced arrangement of agricultural water 
मुख्य बातम्या

हिवरे बाजारने मांडला शेतीपिकांच्या पाण्याचा ताळेबंद

टीम अॅग्रोवन

नगर ः भविष्यकाळात शेतीसाठी बारमाही पाणी मिळणे, आठमाही पिकांचे नियोजन करणे, जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय व जनावरांसाठी बारमाही चारा पिके घेणे आदींसह शेतीसह ग्रामविकास, पर्यटक आदी विषयांवर हिवरे बाजार ग्रामपंचायतीत आढावा घेण्यात आला. 

हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच (३१ डिसेंबर) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत गतवर्षीच्या कामाचा आढावा व नवीन वर्षाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. वर्षभरात विविध खात्यांच्या जमाखर्चाचे आणि १४ वा वित्त आयोग वर्षभरात केलेली कामे व प्राप्त अनुदान यांचे वाचन केले. २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ग्रामसभेत प्रामुख्याने भविष्यकाळात शेतीसाठी बारमाही पाणी मिळणे अवघड असून आठ माही पिकांचे नियोजन करणे तसेच जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय व जनावरांसाठी बारमाही चारा पिके घेतली व सीताफळ लागवड केली. तरच शेतकरी भविष्यात जिवंत राहणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामसभेच्या अध्यक्षपदी सरपंच पोपटराव पवार होते. ग्रामसभेस मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपजी मिटके, परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, वासुदेव सोळंकी उपमुख्य कार्यकारी सामान्य प्रशासन अधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक मा. बेडसे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोस्की, अभियंता साखरवडे, अभियंता डोंगरे आदी उपस्थित होते.

ग्रामसभेतील २०१९ च्या प्रस्तावित कितपत कामांच्या पूर्ततेबाबत ग्रामसेवक सचिन थोरात यांनी आढावा घेतला. त्यात एकूण १३ विषय असून, त्यापैकी १२ विषय पूर्ण करण्यात आले. या वेळी २०१९-२० चा पाण्याचा ताळेबंद व आगामी पीकपद्धतीवर ग्रामसभेत विशेष करून चर्चा करण्यात आली. पिकांचे रानडुकरे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने संपूर्ण शिवाराला कुंपणाची गरज आहे. यावर सविस्तर चर्चा झाली. एस. टी. पादीर यांनी आभार मानले.

पर्यटकांचाही विषय...  १३ वा विषय होता, की हिवरे बाजारमध्ये येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील बाहेरील पर्यटकांना कशा पद्धतीने सामोरे जावे. तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी हिवरे बाजार पाहणीसाठी दिवसाचा नेमका किती वेळ असावा, याबाबत चर्चा झाली. आदर्श गाव म्हणजे सर्व सुविधा उपलब्ध असतील या विचाराने कुठल्याही प्रकारचे आगाऊ सूचना न देता रात्री अपरात्री येऊन ग्रामस्थांशी हुज्जत घालतात. त्यामुळे हा विषय घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT