हिंगोली जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवरील पिके मातीमोल
हिंगोली जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवरील पिके मातीमोल  
मुख्य बातम्या

हिंगोली जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

टीम अॅग्रोवन

हिंगोली : जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ५५१ हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पालकमंत्री अतुल सावे यांनी शनिवारी (ता. २) जिल्ह्याच्या विविध भागांतील पीक नुकासानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सर्वोतेपरी मदत केली जाईल, असा धीर सावे यांनी शेतकऱ्यांना दिला.

सावे यांनी सेनगाव तालुक्यातील येलदरी, चिंचखेडा, भानखेडा, भानखेडा तांडा, हत्ता, हिंगोली तालुक्यांतील केसापूर, सवड, कळमनुरी तालुक्यातील उमरा, औंढा तालुक्यातील बोरजा, येहळेगाव, वसमत तालुक्यांतील वाई येथील नुकसानग्रस्त सोयाबीन, कापुस, ज्वारी आदी पिकांच्या पाहणी केली. 

‘‘पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. सरसकट नुकसानभारपाई देण्यासाठी पाठपुरावा होईल. शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची छायाचित्रे मोबाईलवर जिओ टॅग करून अपलोड केल्यास ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. पंचानामे करून शासनाला अहवाल सादर करावा’’, असे निर्देश सावे यांनी दिले.

आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार जीवककुमार कांबळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT