संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविणे हेच हिंदुत्व

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : केवळ गोमातेला वाचविणे, हे हिंदुत्व आम्ही मानत नाही. गोमातेला वाचविणे हे हिंदुत्व आहेच; पण आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविणे म्हणजेच हिंदुत्व, असे आम्ही मानतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२५) कुडित्रे (ता. करवीर) येथे केले.

कुंभी कासारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि साखर पोती पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका करताना मी सत्तेत असलो तरीही सरकारचे गोडवे गाणार नाही. जे चुकीचे आहे, त्यावर मी बोलणारच, असे स्पष्ट करत नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी अशा कोणत्याच निर्णयाचा लाभ जनतेला झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कारखान्याच्या मैदानावर झालेल्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली. महिने होऊन गेले; पण शेतकऱ्यांच्या कर्जापैकी एक छदामही कर्ज कमी झाले नाही. नुसत्या घोषणा करणार असतील तर या सरकारची मी काय आरती ओवाळू? मग कॉंग्रेस आणि भाजपमध्ये फरक तरी काय?'''' असा सवाल श्री. ठाकरे यांनी या वेळी केला. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी प्रास्ताविक केले.

अजित नरके, दादा लाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार सत्यजित पाटील- सरुडकर, आमदार सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, संग्राम कुपेकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT