कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी रेशीमशेती
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी रेशीमशेती 
मुख्य बातम्या

कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी रेशीमशेती

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘कमी खर्चात, कमी क्षेत्रात किफायतशीर आणि खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेती फायदेशीर ठरू शकते,’ असे मत साताऱ्याचे जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले यांनी बार्शी येथे सांगितले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने बार्शीत आयोजित रेशीम शेतीवरील कार्यशाळेत श्री. फुले बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, स्वयम शिक्षण प्रयोगाचे संचालक उपमन्यू पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डाॅ. लालासाहेब तांबडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, सीताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी, जिल्हा रेशीम अधिकारी एस. डी. जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पक चाटी आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. फुले म्हणाले, ‘रेशीम हे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही रेशीमला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चीनची त्यामध्ये सध्या मक्तेदारी आहे. पण ही मक्तेदारी मोडण्याची ताकद भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. भारतात कर्नाटकची या उत्पादनात आघाडी आहे. केवळ तांत्रिक ज्ञानाअभावी या शेतीकडे फारसे शेतकरी अनुकूल नाहीत. पण या शेतीत लक्ष घाला, निश्चितच फायदा होणार आहे. रेशीमसाठी व्ही-१ हे वाण उत्कृष्ट आहे. त्यासाठी ठराविक लागवड अंतर आणि किटकसंगोपन यासारख्या तांत्रिक ज्ञानाची माहिती करून घ्यावी,’ या वेळी रेशीम शेतीचे विविध तंत्रे त्यांनी सांगितले.

श्री. तांबडे, श्री. जाधव यांनीही त्या संबंधीची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी केले. त्यात या उपक्रमाच्या आयोजनचा हेतू सांगितला. तसेच भविष्यात या उद्योगाला चांगली संधी मिळू शकते, यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सचिन वाघमारे यांनी केले. कृषी तंत्र विद्यालयासह समाधान महिंगडे, सुजित जगताप, ऋषभ शिंदे, महिंद्र वहावणे, श्याम बागडे, श्रद्धा गोटे, प्रियंका बोटे, संपदा हावरे, भाग्यश्री कदम, प्राजक्ता कांबळे यांनी परिश्रम घेतले.

उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव या कार्यक्रमात रेशीम उत्पादनातील शेतकरी उमेश देशमुख, सौ. अरुणा महिंगडे, बाळासाहेब पवार, आनंद पवार, नानासो खोत या शेतकऱ्यांसह कल्पक चाटी, राजकुमार शिंदे, सौ. रेश्मा राऊत यांचा पाहुण्यांच्या हस्ते गैारव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT