सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर; वाहतुकीचा खोळंबा Heavy rains in Sindhudurg; Traffic congestion
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर; वाहतुकीचा खोळंबा Heavy rains in Sindhudurg; Traffic congestion 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर; वाहतुकीचा खोळंबा

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

 गेले दहा-बारा दिवस जिल्ह्यातील काही तालुक्यांत अधूनमधून पाऊस पडत होता. परंतु शुक्रवारी सांयकाळी उशिरा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

कणकवली, वैभववाडी तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपून काढले. कुडाळ, देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. पावसासोबत वादळी वारे देखील वाहत होते. या वादळी वाऱ्यामुळे कणकवली शहरात एका ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली त्यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

या शिवाय वैभववाडी तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. वैभववाडीत तब्बल दीड-दोन तास पाऊस झाला. त्यामुळे शेतमळ्यांमध्ये पाणी साचले होते. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा, डिगस, अणाव, पणदूर, कडावल, या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारपट्टी तालुक्यातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात तर पूर्व पट्ट्यातील आंबा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या पट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान पूर्वमोसमी पावसामुळे होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

SCROLL FOR NEXT