Heavy rains in Nashik district
Heavy rains in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात मुसळधारेने दाणादाण

टीम अॅग्रोवन

नाशिक : गत सप्ताहापासून पावसाने ओढ दिल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दिंडोरी, चांदवड, कळवण, देवळा व निफाड तालुक्याच्या काही भागात हजेरी लावली. मात्र, दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागात व चांदवड तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाल्याने दाणादाण उडाली.

खरीप हंगामातील पिके सध्या काढणीसाठी आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सोंगणीची कामे सुरू आहेत. मात्र, या पावसामुळे शेतीकामे अडचणीत आली आहेत. गुरुवारी (ता.१) दुपारनंतर पावसाला अनेक ठिकाणी सुरुवात झाली.

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने या भागातील काढणीस आलेली सोयाबीन पाण्याखाली गेली. त्यामुळे मोठा फटका बसला.     

चांदवड व दिंडोरी तालुक्यात अनेक भागात पाऊस झाला. वडनेर भैरव, खेडगाव, तिसगाव, बहादुरी या गावांमध्ये द्राक्ष बागेतून पाणी वाहिले. तर, अनेक विहरी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्या. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम आहे.

पोंगा अवस्थेत असलेल्या बागा धोक्यात आल्या आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने नवीन भाजीपाला लागवडी पाण्याखाली गेल्याने त्या खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागात टोमॅटो लागवडी पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गावातील नाल्याला पूर आला. त्यामुळे गावातील फरशीवरुन पाणी आल्याने वडनेर भैरव, खेडगाव, तिसगाव, बहादुरी या गावांचा संपर्क तुटला होता.

मंडलनिहाय पाऊस 

मंडळ  पाऊस(मिमी)
देवळा १९.२
मोकभनगी ३३
पिंपळगाव बसवंत २२
वरखेडा २०
वणी  १९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT