Heavy rains continue in Satara district
Heavy rains continue in Satara district 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरूच

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून सातारा, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी ३३.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांतून ७५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला जात असल्याने नद्या दुधडी भरून वाहत आहे.     

जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात तुलनेत पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साचले असून शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा या तालुक्यात दमदार पाऊस सुरू असून कराड, वाई, खंडाळा या तालुक्यात मध्यम स्वरूपाची संततधार पाऊस सुरू आहे.

माण, खटाव, फलटण या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा झाला आहे. जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी या प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणीसाठा नियंत्रत राहण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वच धरणातून ७५ हजार ७०० क्युसेक पाण्याची विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुट वर उचलत ५३ हजार ८५८ तर पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ५५ हजार ८५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच धोम धरणातून ३८९४, कण्हेर ७०७८, उरमोडी ४३३०, तारळी ४५०० क्युसेक पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. यामुळे कोयना, कृष्णा, तारळी, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत असून प्रशासनाकडून सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सोमवारी सकाळी आठपर्यंतचा प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीसाठा टीएमसी व कंसात टक्केवारी ः कोयना ८७.२६ (८७.१५), धोम ९.६५ (८२.५४), धोम-बलकवडी ३.६५ (९२.३०), कण्हेर ८.८७ (९२.४२), उरमोडी ९.०६ (९३.८४), तारळी- ५.३३ (९१.१५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT