पावसाचा पिकांना फटका
पावसाचा पिकांना फटका 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमन

टीम अॅग्रोवन

अकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड होता. त्यानंतर पावसाने तडाखेबंद पुनरागमन केले आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील निम्म्याहून अधिक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक १५८ मिमी पावसाची नोंद झाली. या भागात २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. सर्वच २६ तालुक्यांत पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यात १५८ मिमी, पातुर तालुक्यात १०३, मूर्तिजापूर तालुक्यात ९४.३,  बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा येथे १२६, देऊळगाव राजा तालुक्यात १०६, सिंदखेड राजा तालुक्यात ९७.७, मलकापूर तालुक्यात ९९, जळगाव येथे ९२, लोणार येथे ८१.५, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात १२४, कारंजा तालुक्यात १२८ मिमी पावसाची नोंद झाली.

या शिवाय अकोट येथे ५२, तेल्हारा ४९, बालापूर ६४, वाशिम ७८, मालेगाव ८१, रिसोड ७३, मंगरुळपीर ९१, चिखली ७८७, मेहकर ७४.३, खामगांव ४५, शेगाव ५१, नांदुरा ६१, संग्रामपूर येथे ६२ मिमी पाऊस नोंदवला गेला.

या जोरदार पावसामुळे बहुतांश नदी, नाले वाहते झाले. मोरणा, आमना, निर्गुणा, काटेपूर्णा नद्या दुथड़ी भरून वाहत आहेत. शेत शिवारांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे मूग, उडीद व सोयाबीन, कपाशी, तूर या प्रमुख पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT