hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

राज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २४) दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानातही वाढ होत आहे. बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती, यामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा आहे. तर विदर्भातही मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.   राज्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अंशत: ढगाळ हवामानामुळे राज्याच्या उकाड्यात वाढ होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१७.६), धुळे ३५.८ (१६.०), जळगाव ३६.४ (१७.०), कोल्हापूर ३६.७ (२१.९), महाबळेश्‍वर ३१.६ (१८.४), मालेगाव ३६.० (२१.२), नाशिक ३४.९ (१९.८), निफाड ३४.० (१३.२), सांगली ३७.८ (२०.६), सातारा ३६.६ (१८.५), सोलापूर ३८.१ (२१.५), अलिबाग २९.२ (२१.८), डहाणू ३१.५ (२३.०), सांताक्रूझ ३१.९ (२३.२), रत्नागिरी ३२.३ (२२.९), औरंगाबाद ३५.३ (२०.८), परभणी ३७.६ (१८.९), अकोला ३७.३ (१९.१), अमरावती ३६.६ (१९.६), बुलडाणा ३४.४ (२१.२), चंद्रपूर (२०.०), गोंदिया ३२.५ (१९.३), नागपूर ३६.५ (१६.५), वर्धा ३६.४ (१९.९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT