weather
weather  
मुख्य बातम्या

राज्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात गारपिटीचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता.१७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरून बाष्पपुरवठा होत आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात जोरदार वारे वाहून विजा, मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नगर, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.  राज्याच्या कमान आणि कमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर दोन दिवस किमान तापमानाचा पारा घसरलेल्या उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली. निफाड व धुळे येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३८ अंश, किमान तापमानाचा पारा १४ ते २५ अंशांवर पोचला आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.    सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६(१४.५), नगर -(१४.५), धुळे ३२.० (११.४), जळगाव ३३.०(१४.५), कोल्हापूर ३५.९(२२.५), महाबळेश्‍वर ३०.५(१७.३), मालेगाव ३१.८ (१५.८), नाशिक ३१.३(१५.२), निफाड ३०.०(११.४), सांगली ३६.६(२१.८), सातारा ३५.१(२१.८), सोलापूर ३८.०(२५.३), अलिबाग -(२१.०), डहाणू ३४.८ (२१.३), सांताक्रूझ ३७.०(२०.६), रत्नागिरी ३४.८(२१.४), औरंगाबाद ३३.०(१७.८), परभणी ३५.६(१९.५), नांदेड ३५.५(२१.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT