Hawaman web
Hawaman web  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.२१) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट वादळी पाऊस पडेल. तर, कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि उद्या (ता. २२) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. बुधवारपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असून खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्नजेसह पाऊस पडेल. सोमवारी औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत काही प्रमाणात शिडकावा होईल. मंगळवारी औरंगाबाद वगळता इतर भागात अंशतः ढगाळ हवामान राहील. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व वर्धा काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. राज्यात अनेक ठिकाणी अधूनमधून ऊन पडणार असून काही प्रमाणात उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT