Hawaman
Hawaman 
मुख्य बातम्या

कोकणात मुसळधारेची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर भागात कमी दाब क्षेत्र आहे. तसेच उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ गंगानगर, हिस्सार हारडोई, दाल्तोगंज, दिगा या भागात सक्रिय आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भाग आणि उत्तर प्रदेश मध्य भाग या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे कोकणात जोरदार पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. येत्या चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडेल.  येथे होणार जोरदार पाऊस  बुधवार ः रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर,  गुरुवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर  शुक्रवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर  शनिवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २७.७ (०.३) 
  • जळगाव - ३१.६ (०.३) 
  • कोल्हापूर - २८.३ (२.१) 
  • महाबळेश्वर - १९.६ 
  • मालेगाव - ३०.६ (०.६) 
  • नाशिक - २८.१ (०.७) 
  • सांगली - २८.४ (०.३) 
  • सातारा - २६.५ ( ०.३) 
  • सोलापूर - ३३.० (१.९) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.६ (०.८) 
  • अलिबाग - ३०.५ (०.८) 
  • रत्नागिरी - ३०.२ (१.८) 
  • डहाणू - ३१.२ (०.९) 
  • औरंगाबाद - २९.७ (०.७) 
  • परभणी - ३२.३ (१.६) 
  • नांदेड- ३१.५ (०.२) 
  • अकोला - ३१.९ (१.१), 
  • अमरावती - ३०.० 
  • बुलडाणा - २८.५ (०.७) 
  • ब्रम्हपुरी - ३२.८ (२.६) 
  • चंद्रपूर - ३४.० (३.०) 
  • गोंदिया - ३१.२ (०.२) 
  • नागपूर - ३२.५ (१.९) 
  • वर्धा - ३७.५ (७.२)   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

    Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

    Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

    Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

    Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

    SCROLL FOR NEXT