hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.२८) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. आज (ता.३०) मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी वादळी, तर मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून (ता.३१) राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांदरम्यान आहे. त्यामुळे चटका वाढला असून, उन्हाचा झळा अनुभवायला येत आहेत. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर व चंद्रपूर येथे प्रत्येकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून (ता.३०) तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. 

दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.१ (२०.४), जळगाव ३६.० (२०.४), कोल्हापूर ३६.३ (२४.४), महाबळेश्‍वर २७.९ (१८.७), मालेगाव ३४.६ (२०.८), नाशिक ३४.२ (१९.८), निफाड ३३.० (१७.०), सांगली ३६.८(२०.४), सातारा ३६.६ (२२.३), सोलापूर ३९.० (२४.०), डहाणू ३०.८ (२२.७), सांताक्रूझ ३४.९ (२३.२), रत्नागिरी ३४.८ (२४.०), औरंगाबाद ३४.९ (२१.२), परभणी ३७.९ (२२.०), अकोला ३८.०(२२.२), अमरावती ३७.२ (२३.२), बुलडाणा ३३.६ (२१.६), ब्रह्मपूरी ३७.७ (२३.८), चंद्रपूर ३९.० (२०.५), गोंदिया ३५.८ (२१.४), नागपूर ३६.१ (२२.८), वर्धा ३६.२ (२३.५). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT