तमिळनाडूला पावसाने झोडपले..
तमिळनाडूला पावसाने झोडपले.. 
मुख्य बातम्या

तमिळनाडूला पावसाने झोडपले..

वृत्तसेवा

चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. राजधानीत २०१५ नंतर प्रथमच झालेल्या मोठ्या पावसाने सखल भाग जलमय झाला आहे. येत्या दोन दिवसात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. तमिळनाडूतील पूरस्थिती पाहून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मदतकार्याला वेग येण्यासाठी मंत्र्यांना आणि शासकीय यंत्रणांना कामाला लावले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी ट्विट करत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून केंद्राकडून सर्वप्रकारची मदत देण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. चेन्नईत रविवारी रात्रभर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आज सकाळी ७.३० वाजेपर्यंत चेन्नईत २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नुंगमबक्कममध्ये १४५ मिलिमीटर, विल्लोवाक्कम येथे १६२ मिलिमीटर आणि पुझल येथे १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले. त्यामुळे रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रल आणि एग्मोरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. कोरात्तूर, पेरम्बदूर, अन्नासलाई, टी नगर, गिंडी, अडयार, पेरुंगुडी, ओएमआरसह चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. तत्पूर्वी चेन्नईत शनिवारपासून मुसळधार पावसास सुरवात झाली. त्यामुळे चेन्नईच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली. उत्तर चेन्नईतील थिरुवूत्रियूर आणि इन्नोर आणि दक्षिण चेन्नईतील वेलचेरी येथे पाण्याने रस्ते जलमय झाले. या पावसाने २०१५ च्या भयावह महापुराची आठवण झाली. या महापुरात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जमले होते. कालच्या पावसाने चेन्नईच्या टी नगरला जबर फटका बसला आहे. तसेच कोरात्तूर येथे देखील गुडघ्याभर पाणी साचले आहे. सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले असून मोटारीच्या मदतीने पाणी उपसले जात आहे. आज पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बचाव पथकावर देखरेख ठेवण्यासाठी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मंत्र्यांना देखील पूरग्रस्त भागात जाण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवस शाळा कॉलेज बंद मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालयास आज सुटी देण्यात आली. तसेच शाळा आणि कॉलेजला दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. चेन्नई परिसरातील पाणीसाठ्यात पातळी वाढू लागल्याने पाणी सोडण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी सोडले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. तमिळनाडू, आंध्रात मुसळधारेचा इशारा येत्या१० आणि ११ नोव्हेंबर रोजी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे सखल भागात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यात दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरून आपत्ती व्यवस्थापनाने चेन्नई आणि मदुराई जिल्ह्यात ४४ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले दोन पथके रवाना केली आहेत. सोमवारी काही भागात पाऊस थांबल्यानंतर मंगळवारी पावसाला पुन्हा जोर येण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT