उन्हाचा ताप वाढणार; ढगाळ हवामानाचा अंदाज
उन्हाचा ताप वाढणार; ढगाळ हवामानाचा अंदाज 
मुख्य बातम्या

उन्हाचा ताप वाढणार; ढगाळ हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे: मार्च महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुढील काळात उन्हाचा ताप वाढत जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) राज्यात आकाश ढगाळ राहून, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटक किनारपट्टीलगत दोन चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या दोन्ही स्थिती दरम्यान, महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानात वाढ होत असली तरी किमान तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याचे कमाल तापमान, उकाड्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.  सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८ (१५.७), नगर - (१५.५), धुळे ३४.६ (१३.०), जळगाव ३५.६ (१७.०), कोल्हापूर ३३.८ (२१.०), महाबळेश्‍वर २९.५ (१६.४), मालेगाव ३५.६ (१७.३), नाशिक ३३.२ (१४.७), निफाड ३१.० (१०.५), सांगली ३४.८ (१९.२), सातारा ३३.८ (१७.८), सोलापूर ३४.६ (१९.८), डहाणू २९.० (१९.३), सांताक्रूझ ३२.१ (१७.०), रत्नागिरी - (२०.४), औरंगाबाद ३२.८(१७.०), परभणी ३५.६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT