राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट
राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट 
मुख्य बातम्या

राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट

टीम अॅग्रोवन

पुणे : मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटक या दरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.  यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण होत आहे. राज्यात उद्या (ता.३१) काही अंशी हवामान ढगाळ राहणार असून शनिवार (ता.१) पासून राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचे संकेत आहे. तसेच, बुधवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची आणि राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.   गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भाच्या पूर्व भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. या लाटेमुळे उन्हाच्या झळा सकाळपासून तीव्र झाल्या असून कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. राज्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार आहे. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणवणार आहे. दुपारी उन्हाचा झळा तीव्र होणार असून कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. दिवसाच्या तापमानासह रात्रीच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मराठवाड्यातही उन्हाचा चांगलाच चटका आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात उन्हाच्या झळा कमी असल्या तरी उकाड्यात सकाळपासून वाढ झाली आहे. त्यामुळे तापमानात काही अंशी वाढ झाली आहे.  मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण ः  गेल्या दोन चार दिवसांपासून मॉन्सूनची प्रगती थंडावली होती. मात्र, आता मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. आज अंदमान बेटाच्या भागात असलेल्या मॉन्सूनची प्रगती होऊन उद्या (शनिवार) उत्तर अंदमानात दाखल होण्याचे संकेत आहे. राज्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान गेलेली प्रमुख शहरे  बीड, सोलापूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ बुधवार (ता.२९) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.७ (३.८), जळगाव ४३.६ (१.४), कोल्हापूर ३८.० (३.२), महाबळेश्‍वर ३४.२ (५.७), मालेगाव ४२.४ (३.१), नाशिक ३८.५ (१.५), सांगली ३९.४ (३.२),  सातारा ४१.२ (६.२), सोलापूर ४३.८ (४.३), मुंबई (सांताक्रुझ) ३४.३ (०.८), मुंबई ३४.० (०.१), अलिबाग ३२.७ (-०.६), रत्नागिरी ३३.६ (०.८), डहाणू ३४.६ (०.३), औरंगाबाद ४२.० (३.२), बीड ४४.२ (४.६), परभणी ४६.१ (४.७), नांदेड ४४.५ (३.२), उस्मानाबाद ४३.४ (५.०), अकोला ४५.६ (३.८), अमरावती ४५.८ (३.८), बुलढाणा ४१.७ (४.०), ब्रह्मपुरी ४६.९ (४.१), चंद्रपूर ४७.८ (४.५), गोंदिया ४५.५ (२.७), नागपूर ४७.५ (४.७), वर्धा ४६.५ (३.९) यवतमाळ ४५.० (३.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT