परभणीत उन्हाच्या चटक्यात वाढ
परभणीत उन्हाच्या चटक्यात वाढ 
मुख्य बातम्या

परभणीत उन्हाच्या चटक्यात वाढ

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर चढत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील भारतीय हवामान विभागाच्या वेधशाळेत कमाल ४५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा हा उच्चांक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मराठवाड्यात येत्या चार दिवसांत उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे. येत्या बुधवारी (ता. १) अनेक जिल्ह्यातील तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यापासूनचा तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात २५ ते ३० या कालावधीत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तविला आहे.

परभणी येथे गुरुवारी (ता. २५) दुपारी कमाल ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी त्यात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली. वाढत्या तापमानामुळे अबालवृद्ध त्रस्त झाले आहेत. उन्हाची काहिली वाढल्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी दहापर्यंत आणि दुपारी पाचनंतर मशागतीची कामे करावी लागत आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने सकाळी अकरा वाजल्यापासूनच रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे. पिंकाबरोबरच, पशुधन, मनुष्यबळाचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी वनामकृवितील ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पातर्फे सुचविलेल्या एकात्मिक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला दिला आहे.

यामध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब फळबागेतील झाडांभोवती जैविक, रेशीम कीटक संगोपनगृहावर प्लॅस्‍टिकचे आच्छादन टाकावे. भाजीपाला पिकास शक्यतो सकाळच्या वेळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पशुधनास सावलीत बांधावे. पत्र्याच्या छतावर तुराट्या, गवताचे आच्छादन टाकावे. आच्छदनावर पाणी शिंपडावे, आदीचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT