उष्णतेत तग धरणारे केळीचे वाण विकसित
उष्णतेत तग धरणारे केळीचे वाण विकसित 
मुख्य बातम्या

उष्णतेत तग धरणारे केळीचे वाण विकसित

Chandrakant Jadhav

जळगाव : येथील केळी संशोधन केंद्राने उष्णता आणि वेगाने वहाणाऱ्या वाऱ्यामध्ये तग धरणारा बुटक्‍या प्रकारचा बीआरएस २०१३ हा केळीचा वाण विकसित केला आहे. याची उंची बसराई जातीच्या केळी वाणापेक्षा कमी आहे. या वाणाच्या धुळे, राहुरी आणि पुणे येथील संशोधन केंद्रांवर चाचण्या सुरू आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या चार वर्षांच्या संशोधनातून बीआरएस २०१३ हा वाण विकसित झाला आहे. इतर संस्थांनी या वाणाचे अनुकरण करून (कॉपी) त्यावर हक्क सांगायला नको यासाठी या वाणाची डीएनए तपासणी आणि फिंगरप्रींट ही प्रक्रिया केळी संशोधन केंद्राने सुरू केली आहे. राहुरी, पुणे आणि धुळे येथील कृषी संशोधन केंद्रांकडून चाचण्यांचे निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर हा वाण पुढील वर्षी प्रसारित होण्याची शक्यता आहे.

प्रक्षेत्रावरील चाचण्यांचे निष्कर्ष चांगले जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात अनेकदा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. मार्च ते जून या काळात उष्ण वारे, तापमानामुळे केळीचे घड सटकणे, झाडे अर्ध्यातून मोडणे असे प्रकार होतात. काहीवेळा मे व जूनमध्ये येणाऱ्या वादळांमध्ये केळी बागा जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान होत असते. या समस्या लक्षात घेऊन बीआरएस २०१३ हा नवा वाण विकसित केला आहे.

निमखेडी (जि. जळगाव) येथील केळी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमधून चांगले निष्कर्ष प्राप्त झाले असून, हा वाण अधिक तापमान व वेगाच्या वाऱ्यात तग धरणारा असल्याचे सिद्ध झाल्याचे केळी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. नाझीमोद्दीन शेख यांनी सांगितले.

अशी आहेत वैशिष्ट्ये

  • ग्रॅण्डनेन वाणांमधून निवड पद्धतीने विकसित
  • बुटक्‍या प्रकारचा वाण, झाडाची उंची कमाल १५८ सेंटिमीटर, घडाचे वजन सरासरी २२ किलो
  • साडेसात महिन्यांत निसवतो. केळीचा घेर १२ सेंटिमीटर, एका केळीची लांबी २१.५ सेंटिमीटर
  • करपा रोगास सहनशील, उष्ण व वेगवान वाऱ्यात तग धरतो.
  • वाऱ्यात पडझडीचे प्रमाण एक हजार झाडांमागे सात ते आठ झाडे
  • एका घडाला दहा फण्या ठेवल्या जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यास मान्यता दिली आहे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    SCROLL FOR NEXT