Heat 
मुख्य बातम्या

राज्यात उन्हाचा चटका वाढला 

टीम अॅग्रोवन

पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. तापमानाचा पारा ४१ अंशांपार गेल्याने सोलापूर आणि अकोला चांगलेच तापले आहे. शुक्रवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे हंगामातील उच्चांकी ४१.१ तर अकोला येथे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता.४) विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या पुर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली. सोलापूर, अकोल्यापाठोपाठ जळगाव, सांगली, परभणी, अमरावती, नागपूर, वर्धा येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. तर पुणे, मालेगाव, सातारा, नांदेड, ब्रह्मपुरी येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे गेल्याने तेथे उन्हाचा चटका अधिकच वाढला आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  वाढलेले तापमान आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.४) विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३२.८, मालेगाव ३८.२, नाशिक ३७.७, निफाड ३७.०, सांगली ३९.४, सातारा ३८.६, सोलापूर ४१.१, डहाणू ३३.१, सांताक्रूझ ३४.८, रत्नागिरी ३३.७, औरंगाबाद ३७.२, परभणी ३९.५, नांदेड ३८.९, अकोला ४१.०, अमरावती ३९.६, बुलडाणा ३५.७, ब्रह्मपूरी ३८.७, गोंदिया ३७.२, नागपूर ३९.२, वर्धा ३९.४. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT