केळी बाग सुकली
केळी बाग सुकली 
मुख्य बातम्या

उन्हाच्या तडाख्यात केळी बागांची होरपळ

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाच्या पानांच्या झिरमाळ्या झाल्या आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढल्यामुळे केळीची पाने होरपळून गेली आहेत. या दुहेरी संकटाने केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत तापमानाचा पारा वर चढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोचले. त्यामुळे दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. रात्रीच्या वेळीदेखील गरम वारे सुटत आहेत. केळी पिकांसाठी प्रतिकूल वातावरण आहे. इसापूर धरणाच्या कालव्याची पाणी आवर्तने मिळाल्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हदगाव तालुक्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अर्धापूर तालुक्यात यंदा केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीचे पाने फाटून झिरमाळ्या झाली आहेत. त्यामुळे केळी पिकास पाणी दिले तरी फाटलेल्या पानांमुळे उन्ह थेट जमिनीवर पडत आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. भिजविलेली जमीन तत्काळ कोरडी होत आहे. केळी पीक निसवण्याच्या अवस्थेत आहे. काही भागांत निसवण सुरू झाली आहे. परंतु, उन्हामुळे पाने होरपळून गेल्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. जायकवाडीच्या कालव्याचे पाणी आवर्तन नाही. परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर तसेच परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. घड पडलेल्या केळीच्या बागा उन्हामध्ये होरपळून निघत आहेत. आधीच पाणी कमी त्यात उन्ह वाढले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर केळी बागा उपटून टाकण्याची वेळ आली आहे. प्रतिक्रिया

इसापूर धरणाच्या कालव्याच्या पाण्यामुळे यंदा विहिरीस पाणी आहे. परंतु, वाऱ्यामुळे पाने फाटली आहे. त्यात आता उन्हात पाने होरपळून गेल्याने जमीन लवकर वाळत आहे. उत्पादन घटणार आहे.  - ज्ञानेश्वर माटे, शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT